शुल्क आकरणी ः पालकांचे युनिव्हर्सल स्कुलसमोर आंदोलन

Foto
एकीकडे कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यातच ऑनलाईन पध्दतीने शाळा सुरू आहे. मात्र शाळेकडून डान्स क्लास, नास्टा, स्कुल बस चे देखील शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे पालकांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेऊन शुल्क आकारणे बंद करा यासाठी युनिव्हर्सल स्कुलसमोर आंदोलन केले. 
ऑनलाईन पद्धतीने सध्या शाळा सुरू आहे मात्र शाळेकडून डान्स क्लास, नाश्ता, स्कूल बस चे शुल्क आकारले जात आहे. शाळे कडून फक्त ट्युशन फी आकारण्यात यावी. शाळेत मुलेच जर येत नाहीत तर स्कूल बस, नाश्ता, आणि डान्स क्लास चे शुल्क का आकारण्यात येत आहेत? असा प्रश्न पालकांनी उपस्थित करून शुल्क आकारण्यात येत असल्याने शाळेविरोधात आज सकाळी युनिव्हर्सल स्कुलसमोर पालकांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. शाळा प्रशासनाने शुल्क न भरल्याने 30 ते 40 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले असल्याचा आरोप देखील पालकांनी यावेळी केला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker